फलटण प्रतिनिधी- फलटण विभागातील मागील ५० वर्षापासून प्रलंबित असलेल्या शहरातील एल.टी. लाईनचे जुने जाळे काढून नवीन ११ फूट उंचीचे पोल उभा करून त्यावर ए.बी. केबल टाकण्यात फलटणचे कार्यकारी अभियंता प्रदीप ग्रामोपाध्याय तसेच प्रकाश देवकाते यांनी मागील वर्षी वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्या नंतर तात्काळ गजानन चौकातील ८ गाळ्यांचे काम श्री. गणपती विसर्जनापूर्वी पूर्ण करून मिरवणुकीमध्ये होणारा मोठा अडथळा दूर केला हे काम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन बारामती, सातारा व सोलापूर विभागाचे चीफ इंजिनियर अंकुश नाळे यांनी केले आहे.

नुकताच बारामती येथे फलटणचे विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप ग्रामोपाध्याय, अतिरिक्त कार्यकारी अभियंता नाळे साहेब शाखा अभियंता प्रदीप ननावरे यांचा सत्कार चीफ इंजिनिअर अंकुश नाळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
यावेळी बोलताना पुढे अंकुश नाळे म्हणाले की, संपूर्ण फलटण शहरामध्ये लवकरच ए बी केबल टाकून तारांचे जाळे कुठे देखील दिसणार नाही याची दक्षता घ्यावी. यामुळे निश्चितच भविष्यातील कोणत्याही मिरवणुकींना अडचण येणार नाही त्यासाठी लाईट बंद करावी लागणार नाही या एबी केवळ वीज चोरीचं प्रमाण रोखले जाणार आहे.तसेच नव्याने कनेक्शन देणे शक्य होणार आहे. यामुळे हे काम तात्काळ पूर्ण करावे अशी ही अपेक्षा शेवटी अंकुश नाळे यांनी व्यक्त केली.
Back to top button
कॉपी करू नका.