फलटण प्रतिनिधी- गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.,फलटणच्या माध्यमातून पशू पालक शेतकरी, महिला यांचा दुग्ध व्यवसाय अधिक फायदेशीर व सुखकर होण्यासाठी आणि ग्राहकांना दर्जेदार दूध व दुग्धजन्य पदार्थ रास्त दरात उपलब्ध करुन देण्यासाठी केलेल्या नियोजन पूर्वक प्रयत्नांमुळे गोविंदने नेहमी उज्वल यश प्राप्त केल्याचे प्रतिपादन गोविंदचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर केले.

गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट चा एकूण 29 व्या वर्धापन दिनानिमित्त व गोविंदला इंडियन डेअरी असोसिएशन यांचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या समारंभात श्रीमंत संजीवराजे बोलत होते. यावेळी गोविंदच्या संचालिका श्रीमंत सौ.शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर, डॉ.जयसिंह मारवाह, चंद्रशेखर जगताप, चंद्रकांत रणवरे, गणपतराव धुमाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी धरमिंदरसिंग भल्ला यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी/महिला, सेंटर चालक, दूध व दुग्ध जन्य पदार्थ विक्रेते, गोविंद मधील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पुढे श्रीमंत संजीवराजे म्हणाले की, जनावरांची उत्पादकता वाढावी, पशू पालक शेतकऱ्यांचे कष्ट कमी व्हावेत आणि यातून निर्माण होणारे दुध हे अधिकाधिक गुणवत्ता पूर्ण असावे, ग्राहकांना दर्जेदार दूध व दुग्ध जन्य पदार्थ मिळून त्यांचे समाधान व्हावे आणि पशू पालक शेतकऱ्यांचाही चांगला फायदा व्हावा यासाठी गोविंद व्यवस्थापन सतत नवनवीन योजना/उपक्रम राबवीत आहे, महिलांचे योगदान या व्यवसायात अत्यंत महत्वाचे, मोलाचे आणि वाखाणण्याजोगे असल्याने त्यांना सहाय्यभूत व उपयुक्त ठरतील अशा काही योजना राबविण्यात येत असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आवर्जून सांगून ते म्हणाले
निर्माण होणाऱ्या आरोग्य वर्धक दुधाची साठवण व वाहतूक यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे. या दुधावर प्रक्रिया व उपपदार्थ निर्मितीसाठी अद्ययावत यंत्रणा उभारण्यात आल्याने आपण उच्च गुणवत्तेचे दुग्ध जन्य पदार्थ तयार करत असून त्यास ग्राहकांची अधिक पसंती आहे, या सर्व कामकाजाची दखल घेऊनच इंडियन डेअरी असोसिएशनने हैद्राबाद येथील समारंभात केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गोविंद डेअरीला राज्यस्तरीय द्वितीय पुरस्काराने सन्मानित केले, यापुढेही गोविंद ग्राहकांसाठी गुणवत्ता आणि पशू पालक शेतकरी यांचे हित या दृष्टीकोनातून वाटचाल चालू ठेवील याची ग्वाही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी यांनी शेवटी दिली.
प्रारंभी गोविंद डेअरीचे संचालक चंद्रशेखर जगताप यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात गोविंद डेअरीची स्थापना पशू पालक शेतकऱ्यांचे हित समोर ठेऊन केली आहे. अगदी सुरुवातीपासून ग्राहक व पशू पालक शेतकरी यांचे हिताला प्राधान्य देण्यात आले आहे, त्यानुसारच आज ३० व्या वर्षात पदार्पण करताना आनंद होत आहे. अधिक गुणवत्तापूर्ण दुध निर्मिती व पशू पालक शेतकरी/महिलांना अधिक फायदा मिळण्यासाठी शासकीय दूध दर अनुदानाची प्रभावी अंमलबजावणी, मुक्तसंचार गोठा, मुरघास, ग्रीन गोविंद बायोगास योजना, कामधेनु वंश सुधार योजना, महिला सक्षमीकरण योजना, पंजाब अभ्यास दौरा, टीएमआर अशा विविध योजना राबविल्या जात असून त्याचा फायदाही होत असल्याचे चंद्रशेखर जगताप यांनी निदर्शनास आणून दिले.
गोविंद डेअरी स्थापनेचा इतिहास, त्यावेळी आलेल्या अडचणी यासह त्यावर मात करत २४० लिटर प्रतिदिन संकलन आज ७ लाख लिटर पर्यंतचा टप्पा पूर्ण केला आहे, ही कौतुकास्पद बाब असून यामध्ये सर्वांचे सहकार्य प्रामुख्याने दूध उत्पादक, सेंटर चालक, दूध प्रक्रिया, दूध वाहतूक, वितरण व्यवस्था, ग्राहक यामुळेच हे शक्य झाले आहे. शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा देत अधिक गुणवत्तेचे दूध गोविंद निर्माण करत असून त्यामुळे देश व विदेशातील काही नामांकित बहुराष्ट्रीय कंपनी गोविंद बरोबर काम करण्यास उत्सुक आहेत ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे चंद्रशेखर जगताप यांनी निदर्शनास आणून दिले.
यावेळी दुध केंद्र चालक संदीप नरळे यांनी दुध संकलन केंद्रावर घेण्यात येत असलेल्या दक्षतेबाबत व गोविंदमुळे झालेल्या प्रगती बाबत आभार मानले, प्रयोगशील आदर्श महिला पशू पालक सौ.स्वाती विजय पवार यांनी श्रीमंत सौ.शिवांजलीराजे नाईक निंबाळकर (वहिनीसाहेब) या गोविंद डेअरीचे दैनंदिन कामकाज, पशू पालक महिला, दुध उत्पादक, डेअरी उत्पादनातील गुणवत्ता यासह देश व देशाबाहेरील वितरण व्यवस्थेवर जाणीवपूर्वक लक्ष देत आहेत, याची दखल अगदी देश पातळीवर सुद्धा घेतली गेली असल्याने गोविंदला आदर्श डेअरी पुरस्कार मिळाला, ही आम्हां सर्व महिला दुध उत्पादकांसाठी अभिमानाची बाब आहे, सौ.आशाताई घाडगे यांनी पंजाब दौरा व ग्रीन गोविंद बायोगस योजनेचा त्यांना फायदा झाल्याचे सांगितले, काजल शेख म्हणाल्या श्रीमंत सौ.शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे गावातील महिला अबला नसून सबला आणि उद्योजक बनत आहेत, दुग्ध व्यवसायात नवे तंत्रज्ञानाचा अवलंब करुन आपली प्रगती साधत असल्याचे अनेक महिलांनी आत्मविश्वासाने सांगितले.
समारोप व आभार दुग्ध व्यवसाय विकास विभाग, महाव्यवस्थापक डॉ.शांताराम गायकवाड यांनी मानले.
Back to top button
कॉपी करू नका.