फलटण प्रतिनिधी- फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज जाधववाडी, फलटण येथे भारतीय स्वातंत्र्याचा ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मेंबर ऑफ गव्हर्निंग कौन्सिल अँड मेंबर ऑफ स्कूल कमिटीचे सदस्य चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने दहावीतील विद्यार्थ्यांनी परेड सादर केली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषणे करून मुलांच्या अंगी असणाऱ्या वकृत्वगुणांचे दर्शन घडवले तर भाषणामध्ये इयत्ता पहिली मधील सलोनी गायकवाड तर इयत्ता सहावी मधील वेदांत कुंभार, सातवी मधील संस्कृती शिंदे, स्वराली जाधव, सिद्धी निकम, सिद्धी इतराज, इयत्ता नववी मधील अविष्कार यादव, इयत्ता दहावी मधील पलक राजपुरोहित या विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरती भाषणे केली तर शिक्षकांच्यामध्ये अभिजीत उराडे सर आणि मनीषा जाधव मॅडम यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व आपल्या भाषणातून सांगितले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा विद्यार्थी परिषदेच्या विविध पदांचे पदग्रहण सोहळा घेण्यात आला आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक वर्षातील जबाबदाऱ्या देण्यात आल्या व त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले आणि त्यानंतर प्राचार्या सौ. संध्या फाळके मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.
तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतिश पवार सर यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी शाळेतील विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त खाऊचे वाटप करण्यात आले.
Back to top button
कॉपी करू नका.