फलटण प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर झाली असून त्यांनी पुन्हा स्वगृही परतावे अशी खुली ऑफर श्रीमंत रामराजे यांचे नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी दिली आहे.
यावर आता फलटणकर काय निर्णय घेणार याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.
पाठीमागील वर्षी एका मेळाव्याच्या निमित्ताने आमदार जयंत पाटील हे फलटण येथे आले होते त्यावेळी त्यांनी सातारा व माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी श्रीमंत रामराजे यांच्यावर दिली होती या निमित्ताने माढ्यातील लोकसभेची उमेदवारी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या घरात म्हणजे श्रीमंत संजीव राजे यांना देऊ असेही याप्रसंगी जयंत पाटील म्हणाले होते.
आता फलटणकर नेमका काय निर्णय घेणार याची उत्सुकता सर्व माढा मतदारसंघात लागून राहिली आहे.
माडाचे विद्यमान खासदार हे भारतीय जनता पक्षाचे असून आजच्या परिस्थितीत माढा लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांना सोडण्यास कितपत तयार होईल हे आज तरी सांगता येत नाही या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी दिलेली खोली आपण अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे भविष्यात आगामी लोकसभा निवडणूक फलटणच्या दोन्ही निंबाळकर मध्ये लढले गेली तर आश्चर्य वाटू नये. कारण आज मितीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांना सक्षम उमेदवार या मतदारसंघात दिसत नाही म्हणून तर ही खुली वापर दिली असावी असे म्हणण्यास जागा राहते.
Back to top button
कॉपी करू नका.