सातारा – गुंगी कारक औषधांच्या अवैद्य विक्रीवर लक्ष ठेण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील किरकोळ औषधे परवाना धारकांनी त्यांच्या दुकानात एक महिन्याच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक आहे, असे अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त म.स. जवंजाळ-पाटील यांनी कळविले आहे.
सीसीटीव्ही कॅमेरेचे फुटेज आवश्यकते प्रमाणे औषध निरीक्षक, बालकल्याण पोलीस अधिकारी आणि शासनाने अथवा जिल्हादंडाधिकारी यांनी नियुक्त केलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना पडताळणीसाठी उपलब्ध करुन देणेही बंधनकारक असल्याचे म.स. जवंजाळ-पाटील यांनी कळविले आहे.
Back to top button
कॉपी करू नका.