फलटण प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सोनवडी बुद्रुक तालुका फलटण जिल्हा सातारा येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ व जाहीर सभा सोमवार दिनांक ७/१०/२४ रोजी सायंकाळी ठीक ५.३० वा संपन्न होणार असल्याची माहिती अक्षय सोनवलकर यांनी दिली आहे.

यावेळी बोलताना पुढे अक्षय सोनवलकर म्हणाले की, या कार्यक्रम प्रसंगी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथ राजे ना. निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती तथा युवा नेते विश्वजीतराजे ना. निंबाळकर इत्यादी मान्यंवर याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
तरी परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे अवाहन शेवटी अक्षय सोनवलकर यांनी केले आहे.
Back to top button
कॉपी करू नका.