फलटण प्रतिनिधी- गेली अनेक वर्षापासून वनपरिक्षेत्र फलटण कार्यक्षेत्रामध्ये जैवविविधतेचे संरक्षण तसेच वन्यजीवांचे संरक्षण तसेच निसर्ग संवर्धन आणि जनजागृती या याबाबतीत आकांक्षा क्लासेस ने अनेक उपक्रम राबवून सक्रिय सहभाग घेतलेला आहे. या आकांक्षा क्लासच्या कार्याची दखल घेत. महाराष्ट्र शासन वनविभाग, सातारा यांनी आकांक्षा क्लासेसला “वनश्री -२०२५ या” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार आकांक्षा क्लासेसचे संचालक संजय जाधव सर व विद्यार्थ्यांनी सातारा विभागाच्या उपवनसंरक्षक
मा. श्रीमती अदिती भारद्वाज यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत स्वीकारला.तसेच या कार्यक्रमाचे आयोजन वन परिक्षेत्र फलटण यांच्या माध्यमातून वन अधिकारी मा.राहुल निकम यांनी केले होते.
Back to top button
कॉपी करू नका.