शेवगाव, ता. 14 : हिरकमहोत्सवी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात साखळी सामन्यात पुरुष गटात धाराशिव, सोलापूर, सांगली यांनी तर महिला गटात धाराशिव, मुंबई उपनगर व रत्नागिरी यांनी विजय मिळवत गटात अव्वल स्थान मिळवले आहे.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशन, अहमदनगर खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने व शेवगाव स्पोर्ट्स बहुउद्देशीय फाउंडेशन, सत्यभामा प्रतिष्ठान, मराठा विद्या प्रसारक समाजाचे न्यू आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर शेवगाव येथे होत असलेल्या हिरकमहोत्सवी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा खंडोबा क्रिडांगणावर सुरु आहे.
आज सकाळच्या सत्रात महिला गटात धाराशिव संघाने छ. संभाजीनगरचा 1 डाव 17 गुणांनी (22-5) पराभव केला. विजयी संघातर्फे मिताली पवार (3.40 मि. संरक्षण), संध्या सुरवसे (3 मि. संरक्षण व 4 गुण) यांनी चांगला खेळ केला.
दुसऱ्या सामन्यात रत्नागिरीने जालन्याचा 12-9 एक डाव 3 गुणांनी पराभव केला. विजयी संघातर्फे रिद्धी चव्हाण (3 मि. संरक्षण व 2 गुण), अपेक्षा सुतार (2 मि. संरक्षण व 2 गुण), पायल पवार (1 मि संरक्षण व 2 गुण) यांनी चांगला खेळ केला. तर जालना तर्फे वैष्णवी मदन (1.10, 1.20 मि. व 2 गुण), वैशाली वाघ (1.10 मि. संरक्षण व 1 गुण) यांनी चांगला खेळ.
तिसऱ्या सामन्यात फ गटात मुंबई संघाने सातारा संघाचा एक गुणाने (10-9) पराभव केला. विजय संघातर्फे सेजल यादव 2 मि., 2.10 मि. संरक्षण व 1 गुण), सिया नाईक (2 मि., 2.10 मि. संरक्षण व 2 गुण), रिद्धी कबीर (4 मि. संरक्षण व 2 गुण) यांनी चांगला खेळ केला. तर सातारा संघातर्फे भाग्यश्री फाले (2 मि., 1.40 मि. संरक्षण व 2 गुण), सलोनी भोसले (2.50 मि. संरक्षण व 2 गुण) यांनी चांगला खेळ केला.
पुरुष गटात धाराशिवने धुळ्याचा एक डाव 8 गुणांनी (17-9) सहज पराभव केला. धाराशिव तर्फे हार्द्या वसावे (2.20 मि., 3.30 मि. संरक्षण), विजय शिंदे 1 मि. संरक्षण व 5 गुण), सचिन पवार (2.40 मि. संरक्षण व 1 गुण), भगतसिंग वसावे (1.30, 1 मि. संरक्षण व 1 गुण) यांनी तर धुळेकडून विकी धनगर (1 मि. संरक्षण व 4 गुण ) यांनी चांगला खेळ केला.
दुसऱ्या सामन्यात सोलापूरने नंदुरबार चा एक डाव एक गुणाने (12-11) पराभूत केले. सोलापूर कडून अजय कश्यप (3.30 मि. संरक्षण व 2 गुण), जुबेर शेख (1.30 मि. संरक्षण व 3 गुण) यांनी चांगला खेळ केला. तर नंदुरबार तर्फे कैलास पटेल (1.10, 1 मि. संरक्षण व 1 गुण) यांनी चांगला खेळ केला.
तिसऱ्या सामन्यात सांगलीने साताऱ्याचा 1 डाव 4 गुणांनी (16-12) पराभव केला. त्यात सागर गायकवाड (3 मि. संरक्षण व 1 गुण), राजू हक्के (1.20 मि. संरक्षण व 3 गुण) यांनी तर साताऱ्यातर्फे ओंकार मासले (1 मि. संरक्षण व 1 गुण ) याने चांगला खेळ केला.
यजमान अहिल्यानगरने नाशिकचा 2 गुण व 5 मि. 40 सेकंद राखून (13-11) विजय मिळवला. अहिल्यानगरतर्फे रामेश्वर नरेंद्र (2.30, 2.10 मि. संरक्षण व 1 गुण), शिवाजी सारंग (2 मि. संरक्षण व 3 गुण ) यांनी तर नाशिक तर्फे ओम कांगणे (2, 1 मि. संरक्षण व 1 गुण ) यांनी चांगला खेळ केला.
साखळी सामन्यात पुरुष गटात पुणे, मुंबई उपनगर, ठाणे, सांगली, सोलापूर, धाराशिव, मुंबई यांनी तर महिला गटात ठाणे, पुणे, धाराशिव, रत्नागिरी, मुबंई यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
——-
नामांकित खेळाडूंचा सहभाग
प्रसिद्ध अल्टीमेट खो-खो स्पर्धा आणि नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या जागतिक खो-खो स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघात सहभागी महाराष्ट्रातील खेळाडू प्रतीक वाईकर, प्रियांका इंगळे, सुयश गरगटे, अनिकेत पोटे, रेश्मा राठोड, अश्विनी शिंदे हे विविध संघातून या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत. त्यांचा खेळ पाहण्यासाठी नगरवासियांनी खंडोबा मैदानावर यावे असे आवाहन अहमदनगर खो-खो असोसिएशन तर्फे करण्यात आले आहे.
Back to top button
कॉपी करू नका.