फलटण- दगडी पूल बुधवार पेठ फलटण येथे संत सेना महाराज समाज मंदिर येथे सर्व नाभिक समाजाच्या वतीने पुण्यतिथीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी सातारा जिल्हा ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष दादासाहेब चोरमले, शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आबा बेंद्रे, फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक फिरोज भाई आतार, फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक अनुप शहा, उद्योगपती बापूराव देशमुख, बंटी शेठ गायकवाड

अमित कर्वे, विकास कर्वे, संजय कर्वे, प्रवीण कर्वे, रोहित कर्वे, राजाभाऊ कर्वे, बंडू कर्वे, मयूर काशीद, दत्तू कर्वे, राहुल पवार, सिद्धार्थ पवार, निलेश गायकवाड, स्वागतशेठ काशीद, तुषार कर्वे, समर्थ पवार, अनिल पवार, सुदाम कर्वे चंदन कर्वे सुभाष कर्वे सागर कर्वे, निखिल वाघमारे, गौरव वाघमारे, सुरज कर्वे, केदार कर्वे
हेमंत चौधरी, विकी कर्वे, दिपक कर्वे, केदार कर्वे, हेमंत चौधरी कर्वे, सागर कर्वे, पांडूरंग घाडगे, दादा गाडेकर, राजू काट, श्रावण कर्वे, अनिल कर्वे, आशिष कर्वे, रोहित कर्वे, पंता कर्वे, अमर राऊत, शौर्य कर्वे, ज्ञानेश्वर कर्वे, मधुकर कर्वे, रमेश साळुंखे, चिकू कर्वे व सोनू कर्वे इत्यादीसह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना विकास कर्वे म्हणाले की, संत सेना महाराज हे वारकरी संप्रदायातील एक प्रमुख संत होते. त्यांनी आपल्या अभंगांमधून विठ्ठलभक्ती व नामस्मरणाचे महत्त्व अधोरेखित केले.
संत सेना महाराजांचा व्यवसाय नाभिक (क्षौरकार) हा होता. सामान्यतः त्या काळी हा व्यवसाय समाजात कनिष्ठ मानला जायचा. पण सेना महाराजांनी आपला व्यवसाय सोडला नाही. उलट “कर्म करताना देखील भक्ती करता येते” हे त्यांनी दाखवून दिले.

ते लोकांचे केस कापताना, दाढी करताना सतत विठ्ठलनाम घेत असत. यामुळे त्यांनी लोकांना समजावले की कर्माचा तिरस्कार न करता, त्यात भक्ती मिसळली की तेही साधना होते.

त्यांच्या कार्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे समता. त्या काळी जातिपातीतून समाज विभागला गेला होता. “ नाभिक” जातीचा असूनही त्यांनी वारकरी संप्रदायामध्ये आपले स्थान निर्माण केले. त्यांच्या अभंगांतून त्यांनी सांगितले की देवाला जात नाही, पात नाही, तो भक्तांच्या हृदयात वसतो.

यामुळे समाजात भेदाभेद कमी होऊन बंधुभाव आणि मानवतेची भावना दृढ झाली.
त्या काळात समाजात अन्याय, अंधश्रद्धा, जातिभेद, उच्च-नीच भेदभाव मोठ्या प्रमाणावर होता. या सर्वांतून समाजाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी “नाम घ्या, समता स्वीकारा, विठ्ठलभक्ती करा” हा संदेश दिला. असे सांगून विकास कर्वे यांनी संत सेना महाराज यांच्या कार्याचा आढावा घेत असताना पुढे ते म्हणाले संत सेना महाराज हे राज दरबारी सलून चे काम करीत होते एके दिवशी चमत्कार घडला साक्षात परमेश्वर विठ्ठलांनी संत सेना महाराजांच्या रूपात येऊन राज दरबारी सलूनचे काम केले. त्यावेळी संत सेना महाराज हे घरीच होते.
नेहमीप्रमाणे संत सेनामहाराज राज दरबारी सलूनचे काम करावयास गेले असता त्यावेळी राजा म्हणाला की अरे आत्ताच तर तू माझी केस दाढी करून गेला आहे. पुन्हा कसा काय आला त्यावेळी संत सेना महाराजांना समजले की दस्तूर खुद्द साक्षात परमेश्वर विठ्ठलाने आपल्या रूपात येऊन आपले कार्य केले आहे. या गोष्टीने संत सेना महाराज विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक झाले व त्यांची श्रद्धा अधिक अधिक दृढ झाली.असेही शेवटी विकास कर्वे यांनी सांगितले.

यावेळी बोलताना अजिंक्य उर्फ बंटी गायकवाड म्हणाली की दरवर्षी संत सेना महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो याच पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षीही संत सेना महाराज यांचा जयंती महोत्सव साजरा करण्यात आला आहे तसेच त्यांच्या उत्सवानिमित्त आज या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून या महाप्रसादाचा लाभ सर्व भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन शेवटी त्यानी केले.
Back to top button
कॉपी करू नका.