फलटण प्रतिनिधी आस्था टाईम्स- सर्वोत्तम कामगिरी व कोर्स मध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल मेजर धीरज रणजित निंबाळकर यांना स्कुडर मेडल देवून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे.
डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेल्लिंगटन येथे लष्करी अधिकाऱ्यांच्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून संरक्षण मंत्री राजनाथसिंह उपस्थित होते.
मेजर धीरज निंबाळकर हे फलटण एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळ सदस्य कृषीतज्ञ स्व. आर. व्ही. निंबाळकर यांचे नातू असून सैनिक स्कूल सातारा, एन. डी. ए. खडकवासला येथे शिक्षण घेतले. डेहराडून येथे लष्करी प्रशासन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जून २०१२ मध्ये त्यांचीअल्मोडा येथे लेफ्टनंट या पदावर नेमणूक झाली, नंतर कॅप्टन, मेजर या पदावर पदोन्नती झाली असून दि. ९ जून २०२५ रोजी लेफ्टनंट कर्नल अधिकारी म्हणून ते आसाम मध्ये रुजू होणार आहेत.
आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटी सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी मेजर धीरज यांचे अभिनंदन केले आहे.
Back to top button
कॉपी करू नका.