ताज्या घडामोडी

फलटण तालुक्यात गॅस एजन्सी कडून होतेय ग्राहकांची आर्थिक लुट ; बुकिंग नंबर बदलल्यामुळे लोकांच्या अडचणी वाढल्या

(जावली /अजिंक्य आढाव)- फलटण तालुक्यातील गॅस एजन्सी कडून ग्राहकांची होतेय आर्थिक लुट यातच सर्वसामान्यांचे महागाई ने कंबरडे मोडले.? असुन जनजीवन विस्कळित झाल्याचे बोलले जात आहे.

केंद्र सरकारने घरातील चुलीचा वापर बंद होऊन वृक्षतोड थांबली पाहिजे व निसर्गसंपत्तीचा ऱ्हास होऊ नये म्हणून तसेच धुरामुळे होणारे दुष्परिणाम याच्यातून महिलांची सुटका व्हावी याकरिता विविध योजना राबवून गोरगरीब व सर्वसामान्य लोकांच्या घराघरात मोफ गॅस कनेक्शन देण्याची सुरुवात केली आहे मात्र दुसरीकडे या कंपन्यांकडून गॅस ग्राहकांची आर्थिक लूट होतांना दिसून येत आहे.

घरगुती स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे गॅस सिलेंडर ऑनलाईन बुकींग केल्यानंतर संबंधित गॅस कंपनीकडून फक्त आणि फक्त गॅस सिलेंडरची शासनमान्य अधिकृत रक्कम घेऊन गॅस सिलेंडर घरपोच सेवा देण क्रमप्राप्त असतांनासुद्धा घरपोच सेवा देतांना गॅस कंपनीचे कर्मचारी घरपोच सेवेसाठी भाडे व इतर खर्चाच्या नावाखाली पन्नास ते साठ रुपये जास्तीचे घेत असल्याने गॅस ग्राहकांना नहाकच आर्थिक झळ सोसावी लागत असल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे फलटण तालुक्यात ग्रामीण भागातील नागरिक वाड्यात वस्त्यावर काही अंतरावर गावे आहेत मात्र गॅस एजन्सी कडून विभागाला असुन मान्यताप्राप्त गॅस कंपनीकडे गॅस ग्राहक स्वताचे भ्रमणध्वनीवरून गॅस सबसिडी मिळवण्यासाठी रितसर ऑनलाईन बुकींग करतात. ऑनलाईन बुकींग केल्यानंतर ठराविक वेळेच्या आत संबंधित कंपनीकडून ग्राहकाचे घरी शासनमान्य किंमतीत गॅस सिलेंडर पोहच करणे बंधनकारक असल्यावर ही काही एजन्सी कडून त्वरित सिलेंडर न देता कंपनीच्या सोयी व सवडीनुसार सिलेंडर वाटप करण्यात येते.

तसेच गॅस कंपनीकडून त्यांच्या नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांने ग्राहकाचे घरी जाऊन गॅस सिलेंडर बसल्यावर तो पेटवून पहाणे, हंडीचे व्हायरस व्यवस्थीत आहे किंवा नाही ते पहाणे, रेग्युलेटर व्यवस्थीत बसले आहे किंवा नाही याचे परिक्षण करणे, तसेच गॅस गळती होणार नाही अशी काळजी घेणे व ग्राहकांना सुचित करणे क्रमप्राप्त असल्यावर ही तसे न करता गावाबाहेर एका ठिकाणी आपले वाहन उभे करुन त्याच जागी सिलेंडर वाटप केले जातात. व हे वाटप करतांना गाडी भाडे व इतर खर्चाच्या नावाखाली पन्नास ते साठ रुपये जास्तीचे घेऊन ग्राहकांची लूट करत आहेत.

व ज्या ग्राहकांनी पैसे दिले नाहीत त्यांना पुढच्या वेळेस सिलेंडरची मागणी केल्यावरही वेळेवर सिलेंडर दिले जात नाही. व गॅस वितरकांना भ्रमणध्वनीवरून विचारणा केल्यास तुम्हाला गरज असेल तर कंपनीच्या ऑफिस वर येऊन सिलेंडर घेऊन जावे असे सांगितले जाते. गॅस कंपनीकडून असे उत्तर मिळत असल्याने जेष्ठ नागरिक, दिव्यांनी नागरिक किंवा खेड्यापाड्यातील शेतमजूर, गोरगरीब व सर्वसामान्य ग्राहकांना शहराचे ठिकाणी सिलेंडर घेण्यासाठी जातांना वाहन व्यवस्था उपलब्ध होत नसल्याने खुपचं खर्चिक व अडचणीचे ठरत आहे.

तरी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पुरवठा अधिकाऱ्यांनी या बाबतीत लक्ष देऊन संबंधित गॅस वितरक कंपनीला सुचना द्याव्यात म्हणजे ग्राहकांची होणारी लुट थांबेल अशी मागणी होत आहे.
मागील काही दिवसांपासून दर वाढीच्या नावावर आर्थिक लुट केली जात असल्याचे ग्राहकांकडून सांगितले जाते आहे.फलटण तालुक्यात ८६१रुपयांचा गॅस सिलेंडर ८८०ते ९५० रुपयांना विकला जातो आहे.या बाबतीत एजन्सी कडून होणारी कधी थांबणार..? पुरवठा अधिकारी या एजन्सीची चौकशी करणार का..?
अशी उलटं सुटलं चर्चा सुरू आहे.येणाऱ्या काही दिवसांवर सण उत्सव येणार असुन दर बाबतीत एजन्सी कडून चौकशी करावी व आर्थिक लुट थाबंवावी…!

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.