ताज्या घडामोडी

माऊली सुळ यांची सहाय्यक प्रशासन अधिकारी वर्ग-१पदी निवड

फलटण -आस्था टाईम्स वृत्तसेवा : सोनवडी खुर्द तालुका फलटण येथील माऊली विजय सुळ यांची एल.आय‌.सी. मध्ये सहाय्यक प्रशासन अधिकारी वर्ग-१ पदी निवड झाली आहे.

माऊली सूळ हे फलटण तालुक्यातील सोनवडी खुर्द तालुका फलटण येथील रहिवाशी असून त्यांचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनवडी खुर्द व माध्यमिक शिक्षण मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे झाले असून त्यांनी वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे येथून बी-टेक केले आहे.यापूर्वी माऊली सुळे आयडीबीआय बँकेमध्ये रत्नागिरी लांजा येथे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून कार्यरत होते. त्यानंतर एल.आय.सी. ऑफ इंडिया मध्ये ५ वर्षे सेवा केल्यानंतर त्यांनी खाते अंतर्गत परीक्षा देऊन त्यांची सहाय्यक प्रशासन अधिकारी वर्ग-१  पदी सुरत गुजरात या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्या नियुक्ती बद्दल सामाजिक शैक्षणिक स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button