ताज्या घडामोडी

रोटरी क्लब ऑफ फलटणच्या माध्यमातून विविध उपक्रमाचे आयोजन करणार- श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर

फलटण – आस्था टाईम्स वृत्तसेवा : रोटरी क्लब फलटणच्या माध्यमातून लवकरच विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती फलटण तालुका रोटरी क्लबचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.रोटरी क्लब फलटणच्या सर्व सदस्यांची मीटिंग आयोजित करण्यात आली होती याप्रसंगी श्रीमंत संजीवराजे बोलत होते.

याप्रसंगी रोटरी क्लबचे सचिव डॉ. महेश बर्वे, गोविंद मिल्क प्रॉडक्ट जनरल मॅनेजर भल्ला, डॉ. गायकवाड, मुधोजी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुधीर इंगळे, विक्रम निंबाळकर इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले की, फलटण तालुका रोटरी क्लबच्या माध्यमातून लवकरच हेल्थ कॅम्प, डेंटल चेकअप व डोळ्यांची तपासणी तसेच
महिला सक्षमीकरण महिलांमध्ये होणाऱ्या कॅन्सरविषयी चाचण्या व उपाय योजना व स्मार्ट व्हिलेज प्रोजेक्ट जावली व तावडी ही गावे निवडले असून तेथे जिल्हा परिषद शाळांमध्ये हेल्थ कॅम्प व इतर उपक्रम राबवले जाणार असल्याचे सांगून श्रीमंत संजीवराजे म्हणतात फलटण तालुक्यातील १० ते १२ गावांमध्ये हेल्थ कॅम्प घेतले जाणार आहेत याप्रसंगी प्रामुख्याने कृष्णा हॉस्पिटल व भारती हॉस्पिटल यांचे मोलाचे सहकार्य लाभणार असल्याचेही शेवटी श्रीमंत संजीवराजे यांनी सांगितले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button