ताज्या घडामोडी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकतीने लढविणार – श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर

तरडगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी खत दुकानाचा शुभारंभ श्रीमंत रामराजे यांच्या शुभहस्ते करण्यात आला

फलटण प्रतिनिधी- आपल्याच काही चुकांमुळे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाने खचून न जाता आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपणाला पुन्हा गतवैभव प्राप्त करावयाचे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

तरडगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने खत दुकानाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्य विधान परिषदेची सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी माजी आमदार दिपकराव चव्हाण सर, फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्हाईस चेअरमन भगवानराव होळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रवीण खताळ, तरडगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन सौ. विजया शिंदे. तरडगाव ग्रामपंचायतच्या माजी सरपंच सौ.जयश्री चव्हाण, राजेंद्र गायकवाड, व्हा.चेअरमन संतोष पवार व दिलीपराव अडसूळ इत्यादी मान्यंवर या प्रसंगी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पुढे श्रीमंत रामराजे म्हणाले की गेल्या ३० वर्षांमध्ये मोठ्या कष्टाने तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे व जनतेला नेहमी न्याय देण्याचाच आपल्या माध्यमातून प्रयत्न झाला असून येणाऱ्या निवडणुका या आपण पूर्ण ताकतीने लढविणार असून यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागण्याचे आवाहनही शेवटी श्रीमंत रामराजे यांनी केले.
याप्रसंगी माजी आमदार दिपकराव चव्हाण सर यांचे भाषण झाले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.