बारामती आस्था टाईम्स वृत्तसेवा – संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रचंड अटीतटीची लढली गेली. यामध्ये मोठ्या प्रमाणावर क्रॉस मतदान झाल्यामुळे कोणा एकाची निर्विवादपणे सत्ता येणार नाही अशी शक्यता असतानाच आण्णांच्या सहकार पॅनेलला फायदा होताना दिसत आहे.
यामध्ये प्रामुख्याने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनेल तर माजी चेअरमन चंदरराव तावरे यांच्या नेतृत्वाखालील सहकार बचाव यांच्यामध्ये प्रामुख्याने लढली गेली. आज या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून पहिला निकाल हाती आला तेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे “ब”वर्ग गटामधून प्रचंड मोठ्या मताधिक्याने निवडून आले असले तरी मात्र “अ” गटातून २० उमेदवार निवडून दिले जाणार असून सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली असून मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग झाल्याची माहिती प्राप्त होत आहे.
विशेष म्हणजे कोणतेही एका गटाचे निर्विवाद सत्ता येईल असे वाटत नसले तरी माझी चेअरमन चंदराव तावरे यांच्या नेतृत्वाखाली १२ ते १३ उमेदवार निवडून येण्याची माहिती प्राप्त होत आहे. क्रॉस वोटिंग मध्ये मध्ये तुतारीच्या ४ ते ५ उमेदवारांना चांगली मते मिळताना दिसत आहेत. याचा फायदा आण्णा- काका यांच्या पॅनेलला होताना दिसत आहे. महिला प्रवर्गातून क्रॉस वोटिंग मुळे अजितदादा गटाची एक महिला व आण्णा गटाची एक महिला आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
माळेगाव, पणदरे या गटातून सहकार बचाव पॅनेलचे चंदरराव आण्णा गटाला चांगली आघाडी मिळताना दिसत आहे.
Back to top button
कॉपी करू नका.