ताज्या घडामोडी

राष्ट्रीय खेळांसाठी खो-खो गटवारी जाहीर डॉ. चंद्रजीत जाधव यांची स्पर्धा संचालक तर लिमा लुईस यांची तांत्रिक संचालक पदी निवड

मुंबई- क्रीडा प्रतिनिधी : (बाळ तोरसकर)- गोवा येथे ४ ते ८ नोव्हेंबर या कलावधीत होणार्‍या ३७ व्या नॅशनल गेम्स खो-खो स्पर्धेसाठीची गटवारी स्पर्धा प्रमुख व खो-खो महासंघाचे सह सचिव डॉ. चंद्रजीत जाधव व खो-खो महासंघाचे महासचिव एम. एस. त्यागी यांनी जाहीर केली. या स्पर्धेत पुरुषांचे व महिलांचे ८-८ संघ सहभागी होत आहेत. पुरुषांचे व महिलांचे अ व ब गटात ४-४ संघ विभागले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्राचे कर्णधार म्हणून पुरुष गटात रामजी कश्यप (सोलापूर) तर महिला गटात गौरी शिंदे (धाराशिव) यांची निवड केली आहे.

पुरुष विभागात अ गटात गतविजेत्या महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, प. बंगल व यजमान गोवा यांना तर ब गटात कर्नाटक, ओडिशा, केरळा व तेलंगाना यांना स्थान देण्यात आले आहे. महिला विभागात अ गटात गतविजेत्या महाराष्ट्रासह गुजरात, केरळ, गोवा तर ब गटात दिल्ली, ओडिशा, कर्नाटक व हरियाणा या संघांना स्थान देण्यात आले आहे. सुरवातीला साखळी पध्दतीने व नंतर बाद पध्दतीने सामने पार पडतील. उपांत्य फेरीचे सामने ७ नोव्हेंबरला सायंकाळी तर अंतिम फेरीचे सामने ८ नोव्हेंबरला सकाळच्या सत्रात पार पडतील.

या स्पर्धेसाठी -खो महासंघाचे सह सचिव डॉ. चंद्रजीत जाधव यांची स्पर्धा प्रमुख (स्पर्धा संचालक) म्हणून निवड झाली आहे. तर गोविंद शर्मा, प्रशांत पाटणकर, किशोर पाटील, कृष्ण कारंजळकर, रात्न्रणी कोळी व सचिन गोडबोले यांची पंच व अधिकारी म्हणून महाराष्ट्रातून निवड झाली आहे.

या स्पर्धेला तांत्रिक संचालक म्हणून गोव्याच्या लिमा लुईस यांची निवड झाली आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.