ताज्या घडामोडी
मलेशियातील खोखो कसोटी मालिकेसाठी महाराष्ट्रातील चौघांची निवड श्रीमंत संजीवराजे यांनी केले अभिनंदन
डॉ. चंद्रजीत जाधव स्पर्धा तांत्रिक संचालक विकास सूर्यवंशी कुमार गटाच्या प्रशिक्षकपदी

मुंबई -खो-खो आता भारतातच नव्हे तर परदेशांत सुध्दा जोमाने खेळला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर विविध देशांमध्ये वेगवेगळ्या वयोगटांच्या स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. त्याचाच भाग म्हणून मलेशियात १२ ते १५ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या कुमार-मुली गट खो-खो कसोटी मालिकेसाठी महाराष्ट्रातील चार खोखो खेळाडूंची निवड झाली आहे.
भारतीय खो-खो महासंघाचे सचिव एम. एस. त्यागी यांनी भारतीय संघ जाहीर केला असून त्यात महाराष्ट्राच्या किरण वसावे (धाराशिव) व निखिल सोडिये (मुंबई उपनगर) यांची मुलांच्या गटात तर संपदा मोरे (धाराशिव) व प्रीती काळे (सोलापूर) (पंढरपूर तालुक्यातील वाडीकुरोलीची) यांची मुलींच्या गटात निवड झाली आहे.
मुलांच्या प्रशिक्षकपदी संभाजीनगरच्या विकास सूर्यवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विकास हे एनआयएस प्रशिक्षक असून राष्ट्रीय खेळाडू,राष्ट्रीय पंच व राष्ट्रीय प्रशिक्षक आहेत. संभाजीनगर जिल्हा खोखो संघटनेचे ते सचिव आहेत.