ताज्या घडामोडी

प्रांतपाल एम. के. पाटील यांच्या उपस्थितीत लायन्स क्लब, फलटण व लायन्स क्लब,फलटण प्लॅटिनम यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन

फलटण प्रतिनिधी – लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी-१ चे प्रांतपाल ॲड.एम.जे.एफ लायन एम.के.पाटील यांच्या उपस्थितीत लायन्स क्लब, फलटण व लायन्स क्लब, फलटण प्लॅटिनम यांच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी लायन्स क्लब फलटणचे अध्यक्ष लायन जगदीश करवा,
लायन्स मल्टिपल कौन्सिल व्हा चेअरमन एम जे एफ ला. भोजराज नाईक निंबाळकर एम जे एफ ला. मंगेश दोशी ला. राजीव नाईक निंबाळकर ला. शैलेंद्र शहा ला. प्रसन्न कुलकर्णी ला. प्रमोद जगताप ला. दोडमिसे ला. केदार करवा ला. रणजीत निंबाळकर ला. चंद्रकांत कदम ला. डॉक्टर अशोक व्होरा ला. मनुभाई पटेल ला. तुषार गायकवाड एमजेएफ लायन सौ.निलम लोंढे पाटील, लायस क्लब प्लॅटिनम फलटणच्या माजी अध्यक्ष ला. वैशाली चोरमले, ला. मंगल घाडगे


लायन्स क्लब फलटण प्लॅटिनमच्या अध्यक्ष लायन संध्या फाळके, लायन्स क्लब फलटण आय हॉस्पिटलचे चेअरमन लायन अर्जुन घाडगे, लायन सुहास निकम, लायन्स क्लब फलटणचे सेक्रेटरी महेश साळुंखे, लायन महेश गरवालीया, लायन क्लब फलटण प्लॅटिनमच्या सेक्रेटरी सौ. लायन ललिता ढवळे, लायन विजय लोंढे पाटील, श्री.माळजाई देवी उद्यान समितीचे चेअरमन लायन प्रमोद निंबाळकर, लायन सुरेश भोंगळे इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.


यावेळी लायन्स क्लब फलटण व लायन्स क्लब फलटण प्लॅटिनम यांच्या वतीने शंकर मार्केट येथील भाजी विक्रेते यांना पाणी पिण्यासाठी चिनी मातीच्या बॉटलचे वाटप करण्यात आले. तसेच महात्मा शिक्षण संस्था संचलित मूकबधिर विद्यालयांमध्ये लायसन निलम लोंढे पाटील यांच्या वतीने हंगर ऍक्टिव्हिटी करण्यात आली. त्याचबरोबर लायन जगदीश करवा यांनी स्वखर्चातून सजावट केलेल्या मिटिंग हॉलचे उद्घाटन प्रांतपाल लायन एम.के. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच लायन्स क्लब संचलित मुधोजी लायन आय हॉस्पिटल येथील नवीन मशनरीला प्रांतपाल एम. के. पाटील यांनी भेट दिली.

याप्रसंगी श्री. माळजाई उद्यान समितीचे चेअरमन प्रमोद अण्णा निंबाळकर यांनी प्रांतपाल एम. के. पाटील यांचा येतोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रांतपाल एम. के. पाटील यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण हा कार्यक्रम देखील घेण्यात आला होता.


यावेळी एक विशेष सत्काराचे आयोजन केले होते यामध्ये प्रामुख्याने लायन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटल ला, अध्यक्ष ला. जगदीश करवा यांनी फरांदवाडी स्वरा सिटी मधील हॉस्पिटल लगतची स्व मालकीची अजून दहा गुंठे जागा ऑप्टोमेट्री कोर्ससाठी इतर ऍक्टिव्हिटी साठी बक्षीस दिल्याबद्दल प्रांतपालाच्या हस्ते अध्यक्ष जगदीश करवा यांचा यथोचित व विशेष सत्काराचे आयोजक करण्यात आले होते.

लायन जगदीश करवा यांच्या दानशूर व्यक्तिमत्वामुळे आता हॉस्पिटलची स्व मालकीची वीस गुंठे जागा झाली आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.