फलटण प्रतिनिधी – सातारा जिल्हा पोलीस दलातील सर्व महिला पोलीस कर्मचारी व अधिकारी यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष पुरविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी केले.

८ मार्च हा सर्वत्र जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या जागतिक महिला दिनाचे निमित्ताने जिल्हा पोलीस दलातील सर्व महिला पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ., वैशाली कडूकर, पोलीस उपाधीक्षक अतुल सबनीस, डॉ. राहुल खाडे, सपोनिअभिजीत यादव इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पुढे समीर शेख म्हणाले की महिला आपल्या कामांमध्ये व्यस्त असतात अशावेळी त्या आपल्या आरोग्याबाबतीत नेहमी उदासीन दिसून येतात त्यामुळे त्यांना अनेक वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागते म्हणून महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष पुरवणे गरजेचे असल्याचेही शेवटी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख म्हणाले.

या आरोग्य शिबिरामध्ये प्रामुख्याने जनरल चेकअप सह महिलांमधील स्तनाचा कॅन्सर, गर्भाशय आणि मुखाचा कॅन्सर, हाडांचा ठिसूळपणा B-12, D-3 इत्यादी तपासण्या मोफत करण्यात आल्या.
सदरचे आरोग्य शिबिराचे आयोजन सातारा जिल्हा पोलीस मुख्यालय, क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय, ऑबस्टेट्रिक गायनॅकॉलॉजी सोसायटी, जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन सातारा, पाॉलीश पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सदरच्या शिबिरांमध्ये सातारा जिल्हा पोलीस दलातील ४१० महिला पोलीस, अधिकारी व अंमलदार यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

सदर वैद्यकीय तपासणी शिबिरा करतात ऑबस्टेट्रिक अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. विलास फडतरे, सचिव डॉ. किरण सोनवलकर व इतर गायनॅकॉलॉजिस्ट सातारा तसेच

जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन सातारा सम्राज्ञ लेडीज विंगचे डॉक्टर्स क्रांतिसिंह नाना पाटील सर्व उपचार रुग्णालय सातारा येथील नर्सिंग स्टाफ, बोकील मेट्रोपाॉलीस पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी, सातारा यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
Back to top button
कॉपी करू नका.