फलटण आस्था टाईम्स वृत्तसेवा – छ. संभाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी व इतर देखरेख करण्याकरीता एक वॉचमन ठेवण्यात आलेला असला तरी संबंधित वॉचमनला सहकार्य करण्यासाठी व तसेच या परिसराचे पावित्र्य राखण्यासाठी आपण सर्वांनी देखील कटिबद्ध रहावे असे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर यांनी केले.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसराचे सुशोभीकरण व लाईट व्यवस्था करण्याचा प्रारंभ आज श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला याप्रसंगी श्रीमंत संजीवराजे बोलत होते.

यावेळी फलटण संस्थांचे युवराज श्रीमंत अनिकेत राजे ना. निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे ना. निंबाळकर, फलटण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, फलटण नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष नितीन भोसले, सातारा जिल्हा ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष दादासाहेब चोरमले,
प्रसिद्ध उद्योजक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फलटण शहराध्यक्ष प्रमोद अण्णा निंबाळकर, सरस्वती एज्युकेशन सोसायटीचे सर्वेसर्वा विशाल पवार, फलटण नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका सौ. प्रगती कापसे,
माजी नगरसेवक किशोर सिंह नाईक निंबाळकर, तुषार नाईक निंबाळकर, निजाम भाई आतार, प्राचार्य सागर निंबाळकर, माजी प्राचार्य सुधीर इंगळे, भाऊसाहेब कापसे, सनी शिंदे,अमरसिंह पिसाळ, निखिल डोंबे, माजी उपनगराध्यक्ष सुनील मठपती, गणेश शिरतोडे, विजय जाधव, विजय भोंडवे, तात्यासो तेली, पै. अभिजीत जानकर, प्रितसिंह खानविलकर, फलटण नगरपरिषद शिक्षण मंडळाची माजी सभापती विजय लोंढे पाटील, इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पुढे श्रीमंत संजीवराजे म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज यांचे फलटण हे आजोळ असल्यामुळे फलटणला छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक व्हावे अशी सर्वच फलटणकरांची इच्छा होती.

या भावनेतूनच महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पुतळा स्मारक समिती तयार करून या स्मारक समितीच्या माध्यमातून सदरचा पुतळा बसविण्यात आला असल्याचे सांगून श्रीमंत संजीवराजे म्हणाले म्हणतात की,

छत्रपती संभाजी महाराज यांनी मराठा साम्राज्य पसरवण्यासाठी मोठे योगदान दिले असून त्यांच्या त्यागामुळेच हे सर्व शक्य झाले आहे हे विसरता येणार नाही त्यांच्यापासून तरुणांना स्फूर्ती मिळावी या उद्देशाने हा पुतळा बसविण्यात आला असून या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये अशी काळजी आपण सर्वांनीच घेतली पाहिजे तसेच लवकरच पुतळ्या समोरील भिंत पाडून या ठिकाणी आकर्षक असे डिझाईन करण्यात येणार
असून या पुतळ्याचे संपूर्ण सुशोभीकरण करणे कामी फलटण नगर परिषदेने एक आकर्षक असा आराखडा तयार केला आहे .भविष्यात लवकरच या भागाचे चांगल्या पद्धतीने सुशोभीकरण केले जाईल असेही शेवटी श्रीमंत संजीवराजे म्हणाले.
Back to top button
कॉपी करू नका.