फलटण प्रतिनिधी- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सातत्याने २० वर्षे तत्कालीन ब्रिटिश सरकारकडे पाठपुरावा करून अस्पृश्याकरिता “महार रेजिमेंटची” १ ऑक्टोबर १९४१ रोजी स्थापना करण्यास भाग पाडले तेव्हापासून या रेजिमेंटने अतुलनीय शौर्य दाखवून देशभक्ती व समाज निष्ठेचा गौरवशाली इतिहास कायम ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याच्या ऐतिहासिक भूमीत फलटण तालुका येथे “युद्ध-सन्मान महार रेजिमेंट” सोहळा रविवार दिनांक १५ डिसेंबर २०२४ रोजी “स्वप्नशिला मंगल कार्यालय” वाठार निंबाळकर फलटण पुसेगाव रोड येथे महार रेजिमेंट आजी-माजी सैनिक आजी सैनिक दलाच्या विद्यमाने संपन्न होत असल्याची संघटनेचे अध्यक्ष सुभेदार दीपक संकपाळ उपाध्यक्ष हवलदार बाळू कांबळे सचिव सुभेदार मोहन यादव खजिनदार सुभेदार डि.के. क्षिरसागर कोषाध्यक्ष ना. सुभेदार उत्तम मोहिते अध्यक्ष हवलदार दादासाहेब भोसले यांनी एका प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकार मध्ये पुढे ते म्हणतात की आंबेडकरी अनुयायी म्हणून तुम्हा आम्हा सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची व स्वाभिमानाची तसेच समाधानाची बाब आहे.
महार रेजिमेंटने १९६२ १९६५ १९७१ चीन व पाकिस्तान या देशावर लढाई करून भारत देशाला विजय मिळवून दिला तसेच ऑपरेशन विजय कारगिल तसेच ऑपरेशन पवन श्रीलंका या ठिकाणी सुद्धा चांगल्या प्रकारे कार्य केल्याने महार बटालियनला परमवीर चक्र, महावीर चक्र, वीरचक्र,कीर्ती चक्र व विशेष सेना मेडल मिळाले असून दोन चीफ ऑफ द आर्मी स्टाफ जनरल दिले आहे आज या रेजिमेंट चा २२ बटालियन २ टि.ए. हे बटालियन -२ राष्ट्रीय रायफल बटालियन आणि महार सेंटर, सागर मध्य प्रदेशमध्ये आहे. या कार्यक्रमांमध्ये अनेक शूरवीर आजी-माजी सैनिकांचा व वीरपत्तेचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती ही प्रसिद्धी पत्रकार देण्यात आली आहे.
तरी सदरच्या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे अवाहन संयोजकांनी केले आहे.
Back to top button
कॉपी करू नका.