ताज्या घडामोडी

प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गुणवरेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

फलटण प्रतिनिधी- सरस्वती शिक्षण संस्था, गुणवरे संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवार दिनांक ७ डिसेंबर २०२४ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थेचे सचिव विशाल पवार यांनी संस्थेच्या कामकाजाची माहिती दिली व संस्थेच्या कार्याचा आढावा दिला.


कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार दिपक चव्हाण यांच्या शुभहस्ते संपन्न करण्यात आले. यावेळी फलटण नगर परिषदेच्या ज्येष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे ना. निंबाळकर, महात्मा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष दादासाहेब चोरमले, रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन श्री. राजेंद्र शिर्के सर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा प्रवक्ते श्री शंभूराज खलाटे, सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री शिवाजीराव गावडे, प्रसिद्ध व्यापारी श्री नितीन शांतीलाल गांधी, फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक श्री किशोरसिंह ना. निंबाळकर, सौ. प्रगती जगन्नाथ कापसे, फलटण नगर परिषदेच्या नगरसेविका सौ. वैशाली कृष्णात चोरमले, श्री श्रेयश कदम, श्री शिवाजीराव लंगुटे ,श्री खाशाबा जाधव, फलटण तालुका शिवसेना अध्यक्ष श्री विकास नाळे, श्री सचिन वाघमोडे ,
इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार दिपक चव्हाण म्हणाले की सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव विशाल पवार यांनी खूप मेहनती मधून ही संस्था उभी केली असून या संस्थेमध्ये शिकावयास येणाऱ्या मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण दिले जाते शिक्षणाबरोबर क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रातील ही मुले आघाडीवर जावीत यासाठी त्यांना प्रोत्साहित करून त्यांच्यासाठी काम केले जात असल्यामुळंच अगदी कमी वेळात हे संस्था पूर्व भागामध्ये नावारूपाला आली असल्याचे नमूद करून ते म्हणतात भविष्यातही ही शिक्षण संस्था उत्तरोत्तर प्रगती करेल अशी अपेक्षा हि शेवटी दिपक चव्हाण यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी श्री मनोज पवार, सन्माननीय सौ. पूनम पवार, सरस्वती शिक्षण संस्थेचे संस्थापक सन्माननीय श्री.पांडुरंग पवार व सौ.सुलोचना पवार, संस्थेचे सचिव सन्माननीय श्री.विशाल पवार तसेच संस्थेच्या कार्यकारी संचालिका सन्माननीय सौ.प्रियांका पवार, प्रशालेचे विद्यमान प्राचार्य सन्माननीय श्री.किरण भोसले , उपप्राचार्या सौ. स्वरदा जाधव , समन्वयिका सौ. सुप्रिया सपकाळ तसेच पालक वर्ग, शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

पूर्व प्राथमिक विभागातील नर्सरी ते युकेजी, प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये विद्यार्थ्यांनी कोळीगीत, धनगर गीत, लावणी, पंजाबी, शेतकरी गीत, गोंधळ, इंग्लिश सॉंग यासारख्या विविध प्रकारच्या गीतांवर नृत्य सादर करत आपल्या कला दाखवल्या. स्नेहसंमेलनाचा आकर्षक ठरलेल्या कांतारा या नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.तसेच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी फू बाई फू कॉमेडी नाटक सादर केले. तसेच इयत्ता चौथी ते नववीतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अफजलखानाचा वध या ऐतिहासिक नाटिकेने सर्व प्रेक्षकांना भारावून टाकले. इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनींनी भारतरत्न गान कोकिळा लता मंगेशकरजी यांनी गायलेल्या सुपरहिट हिंदी गाण्यांवर नृत्य करून त्यांना पालकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या समन्वयिका सौ.सुप्रिया सपकाळ व शिक्षिका सौ. उषा आडके यांनी केले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.