फलटण प्रतिनीधी- सातारा येथील छत्रपती शाहू स्टेडियम येथे झालेल्या विभागीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये १९ वर्षाखालील मुलींच्या गटात ४८ किलो वजनी गटांमध्ये फलटणची सुकन्या कु. धनश्री राहुल तेली हिचा प्रथम क्रमांक आला असून तिची राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

मागील वर्षीही कुमारी धनश्री तेली हिने राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले होते. त्यामुळे यंदाच्या वर्षीही ती राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी करून सुवर्णपदक मिळेल अशी अपेक्षा तिचे कोच सतीश नाळे यांनी व्यक्त केली आहे.
तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेची माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथ राजे ना. निंबाळकर, माजी आमदार दिपक चव्हाण, सातारा जिल्हा ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष दादासाहेब चोरमले इत्यादी मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
Back to top button
कॉपी करू नका.