फलटण प्रतिनिधी- क्रांतीसुर्य प्रतिष्ठान फलटण यांच्या वतीने महात्मा शिक्षण संस्था संचलित मूकबधिर मुलांच्या वसतिगृहातील मुलांना दहा हजार रुपये किमतीच्या किराणा व शालेय साहित्याचे मोफत वाटप क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा मिलिंद नेवसे यांच्या वतीने करण्यात आले.
या प्रसंगी महात्मा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष दादासाहेब चोरमले महात्मा शिक्षण संस्था सिंचलित विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली शिंदे, उपशिक्षिका हेमा गोडसे, उपशिक्षिका सौ.विजया मठपती, निर्मला चोरमले इत्यादी मान्यंवर या प्रसंगी उपस्थित होते.
क्रांतीसुर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून मिलिंद नेवसे हे सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, साहित्य व आरोग्य क्षेत्रामध्ये हिरीरीने काम करीत असतात त्यांच्या नेतृत्वाखाली क्रांतीसुर्य प्रतिष्ठान नेहमीच समाजातील उपेक्षित व दुर्लक्षित घटकांना मदत करीत असते.
Back to top button
कॉपी करू नका.