फलटण प्रतिनिधी- फलटण येथे जोशी हॉस्पिटल फलटण यांच्या वतीने आयोजित केलेल्या मॅरोथॉन स्पर्धा बक्षीस वितरण समारंभात व्हीआयपी सुरक्षा विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अधिकारी महाराष्ट्र राज्य कृष्णप्रकाश यांच्या शुभहस्ते व महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू कु. अक्षता ढेकळे हिने एशिया कप स्पर्धेत भारताला गोल्ड मेडल मिळवून दिल्याबद्दल विशेष सत्काराने सन्मानित करण्यात आले.
कुमारी अक्षदा ढेकळे ही फलटण तालुक्यातील वाखरी गावची खेळाडू असून तिने आजपर्यंत हॉकी क्षेत्रामध्ये अनेक सुवर्णपदके मिळवली आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये हॉकीच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारी आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू म्हणून तिचा नावलौकिक आहे. तिने आपल्या देशासाठी खेळताना व राज्यासाठी खेळताना चमकदार कामगिरी करून भारत देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पदके मिळवून दिली आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघासाठी देखील अनेक पदके प्राप्त करून दिली आहेत. अक्षदा ढेकळे ही एक गुणी खेळाडू म्हणून सर्वत्र परिचित आहे. तिच्या या कामगिरीचा निश्चितच आपणा सर्वांना रास्त अभिमान आहे.
याप्रसंगी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते सुभाषभाऊ शिंदे, सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मा.प्रल्हादराव साळुंखे पाटील, फलटण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष मा. दिलीपसिंह भोसले, डॉ. प्रसाद जोशी उपस्थित होते.
Back to top button
कॉपी करू नका.