ताज्या घडामोडी

श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज एस.एस.सी. फलटण मध्ये योगा दिनाचे आयोजन

फलटण प्रतिनिधी- फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडयम स्कूल & ज्युनियर कॉलेज फलटण (SSC) येथे २१ जून २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय ९ व्या योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या सौ. संध्या फाळके आंतरराष्ट्रीय योग दिना विषयी बोलताना म्हणाले की, खऱ्या अर्थाने सर्वप्रथम भारताचे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी २०१४ च्या सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. भारताच्या नेतृत्वाखालील १७५ देशांच्या प्रतिनिधींकडून हा प्रस्ताव करण्यात आला होता. या प्रस्तावात योगासनांचे फायदे आणि त्याचे आरोग्यावरील परिणाम यांचे विस्तृत विवेचन करण्यात आले होते. संयुक्त राष्ट्रांमधील भारतीय वकिलातीत ऑक्टोबर महिन्यात या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर अन्य देशांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडण्यात आला. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधी लाभले. विशेष म्हणजे संयुक्त राष्ट्रातील सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले चीन, फ्रान्स, रशिया, इंग्लंड आणि अमेरिका हे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी होते. या प्रस्तावावर चर्चा केल्यानंतर संयुक्त राष्ट्राने २१ जून हा “आंतरराष्ट्रीय योग दिन” साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. २१ जून २०१५ या दिवशी पहिला “आंतरराष्ट्रीय योग दिन” साजरा करण्यात आला असल्याचे शेवटी फाळके म्हणाल्या आज जगभर जागतिक योग दिवस साजरा होत असतानाच फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडयम स्कूल & ज्युनियर कॉलेज फलटण (SSC) येथे योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शाळेतील सर्व मुलांचे शारीरिक व्यायाम आणि योगासने यामध्ये सहभागींनी उभ्या, बैठ्या आणि निद्रा स्थितीतील ताडासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोनासन, भद्रासन, शशांकासन, वक्रासन, भुजंगासन, शलभासन, मक्रासन, सेतुबंधासन, शवासन, कपालभाती, अनुलोम-विलोम, भ्रामरी व ध्यान आदी योगासनांचे प्रकार यावेळी करून घेण्यात आले.

या वेळी विद्यालयाच्या प्राचार्या संध्या फाळके, महेश निंबाळकर आणि इतर शिक्षक उपस्थीत होते.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.