आरोग्य व शिक्षण

जावलीत गटर लाईन फुटल्याने रस्त्यावर सांडपाण्याचे साम्राज्य ; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ..!

दुर्गंधी, चिखल आणि साचलेल्या सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त ; तातडीने दुरुस्तीची मागणी

(जावली /अजिंक्य आढाव )फलटण तालुक्यातील जावली गावात गटर लाईन फुटल्यामुळे सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात सांडपाणी साचल्याने दुर्गंधी पसरली असून वाहनचालक, पादचारी तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

शिखर शिंगणापूर  कडे जाणारा रोड गटरचे पाणी अनेक दिवसांपासून रस्त्यावर वाहत असल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे रस्ता निसरडा बनला असून अपघाताचा धोका वाढला आहे. साचलेल्या सांडपाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

स्थानिक ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन फुटलेली गटर लाईन दुरुस्त करावी, रस्त्यावरील सांडपाण्याची विल्हेवाट लावावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button