आरोग्य व शिक्षण
जावलीत गटर लाईन फुटल्याने रस्त्यावर सांडपाण्याचे साम्राज्य ; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ..!
दुर्गंधी, चिखल आणि साचलेल्या सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त ; तातडीने दुरुस्तीची मागणी


गटरचे पाणी अनेक दिवसांपासून रस्त्यावर वाहत असल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे रस्ता निसरडा बनला असून अपघाताचा धोका वाढला आहे. साचलेल्या सांडपाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.