ताज्या घडामोडी

हिंदू – मुस्लिम बांधवांच्या वतीने रमजान या पवित्र सणानिमित्त शनिवारवाडा येथे “इफ्तार पार्टीचे” आयोजन

फलटण प्रतिनिधी – मुस्लिम बांधवांच्या मध्ये “रमजान” हा पवित्र महिना मानला जातो. या पवित्र “रमजान” महिन्यामध्ये मुस्लिम बांधवासह अनेक हिंदू बांधवही महिनाभर आपले रोजे उपवास ठेवतात म्हणजेच यामधून जातीय सलोखा, विविधता, एकता, बंधुभाव, सामाजिक ऐक्याचे दर्शन घडविले जाते याच पार्श्वभूमीवर काल फलटण येथील शनिवार वाडा, बुधवार पेठ येथे मुस्लिम बांधवांना शनिवारवाडा-पिसाळ गल्ली मित्र मंडळ व तेली गल्ली मित्र मंडळाच्या वतीने “इफ्तार पार्टीचे” आयोजन करण्यात आले होते.

यावेळी संयोजकाशी आमच्या प्रतिनिधीने संवाद साधला असता ते म्हणाले की, अशा “इफ्तार पार्टी” मधून मानवतेच्या भिंती उभारून आपापसातील मतभेद बाजूला करून मनातील द्वेष विसरून केवळ मानवता हाच धर्म समजत सर्व देशीवासीयांनी बंधू भावाने आपुलकीने प्रेमाने एकत्रित रित्या राहण्याचा संदेश या पवित्र रमजान महिन्यांमध्ये सर्व भारतीय नागरिकांना दिला जात असतो.
“रमजान सणा” निमित्त दररोज पहाटे सकाळी पाच वाजता म्हणजे सूर्योदयापूर्वी सहेरी करून रोजा उपवास धरला जातो. त्यानंतर दिवसभर काहीही न खाता पिता अल्लाची उपासना केली जाते. त्यात मुस्लिम धर्माचे पवित्र धर्मग्रंथ कुराण शरीफ चे पठण केले जाते पाच वेळा नमाज पडली जाते तसेच सूर्याचा सूर्यास्ताच्या वेळी रोजा अल्लाच्या साक्षीने पेंडखजूर खाऊन सोडला जातो इशाच्या नमाज नंतर ठराविक तरावीह नमाजाची तयारी करतात,तरावीह नमाज मध्ये पवित्र धर्मग्रंथाचे पठण केले जाते.
त्याचबरोबर शनिवारवाडा येथे असणारे पिरसाहेब दर्गा हे हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाते. या ठिकाणी सर्व जाती-धर्माचे लोक येऊन दर्शन घेत असतात, या भागातील मुस्लिम बांधव हे सर्व धर्मीय बांधवांशी मिळून मिसळून राहत असल्यामुळेच आजची ही ”इफ्तार-पार्टी” सर्व समाजाने आयोजित केली असल्याची माहिती ही शेवटी संयोजकांनी दिली.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.