फलटण प्रतिनिधी-जय भवानी एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीराम खोलेश्वर माध्यमिक विद्यालय मुंजवडीचा सन 2023 – 24 दहावी बोर्डचा निकाल 92.50 % इतका लागला असून विद्यालयातील प्रथम तीन क्रमांकाचे मानकरी खालील प्रमाणे प्रथम क्रमांक
कु.सविनय भीमसेन रणदिवे एकूण गुण 456 शेकडा गुण 91.20% द्वितीय क्रमांकाचा मानकरी दत्तात्रय भागचंद्र येडे असुन त्याला एकूण गुण 439 शेकडा गुण 87.80% तर तृतीय क्रमांक कु.अंजली अनिल माळवे एकूण गुण 424 शेकडा गुण 84.80%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन वाघमोडे, शालेय पोषण हा आहाराचे चेअरमन रामचंद्र शिंदे लालासाहेब रणदिवे, मुंजवडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच हरिभाऊ कदम गंगाराम रणदिवे शरद झेंडे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक दादासाहेब चोरमले, दिपक भापकर, प्रवीण निंबाळकर, राजेंद्र येळे सर, ढवळे मॅडम इत्यादींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. संस्थेच्यावतीने व विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन केले आहे.
Back to top button
कॉपी करू नका.