फलटण प्रतिनिधी – ऐतिहासिक पार्श्वभूमी असणाऱ्या फलटणच्या मुधोजी मनमोहन राजवाड्याला विशेष पोलीस महानिरीक्षक मा.श्री. सुनील फुलारी साहेब यांनी सदिच्छा भेट दिली.

या वेळी त्यांच्यासमवेत साताऱ्याचे पोलीस अधीक्षक श्री समीर शेख, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौ. वैशाली कडूकर, फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

या वेळी फलटण पंचायत समितीचे माजी सभापती तथा युवा नेते मा. श्रीमंत विश्वजीतराजे रघुनाथराजे ना. निंबाळकर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.

यावेळी फलटणचा ऐतिहासिक राजवाडा मा. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी व त्यांच्या सर्व सहकारी अधिकाऱ्यांनी ऐतिहासिक राजवाड्याची माहिती महेश ढवळे यांच्या कडून घेतली व सर्व राजवाडा फिरून पाहिला व ऐतिहासिक काळातील आठवणी पाहून विशेष आनंद व्यक्त केला.
Back to top button
कॉपी करू नका.