फलटण प्रतिनिधी- महात्मा शिक्षण संस्था संचलित मूकबधिर विद्यालयांमध्ये सौ.पायल गुणानी व विक्रम गुणानी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
यावेळी भारतीय लष्करी सेवेत कार्यरत असणारे फौजी अनिल काटकर व सौ.भाग्यश्री काटकर, झोन चेअरमन लायन सौ. निलम लोंढे पाटील महात्मा शिक्षण संस्थेच्या सचिव तथा लायन्स क्लब फलटण प्लॅटिनमच्या अध्यक्षा सौ. वैशाली चोरमले, मूकबधिर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली शिंदे इत्यादीत मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
ध्वजवंदनानंतर कार्यक्रमास उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे व भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत असणारे फौजी माश्री अनिल काटकर व सौ.भाग्यश्री काटकर यांचा यावेळी विद्यालयाच्या वतीने शाल श्रीफळ व मुलांनी केलेला बुके देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी उदय निकम, सौ. हेमा गोडसे, सौ विजया भोजने, अविनाश चोरमले, निर्मला चोरमले, चैतन्य खरात, नितेश शिंदे इत्यादी उपस्थित होते.