फलटण प्रतिनिधी- जय भवानी एज्युकेशन सोसायटी गिरवी संचलित श्रीराम खोलेश्वर माध्यमिक विद्यालयामध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त सदाशिव ठणके पाटील यांच्या शुभहस्ते 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.
यावेळी मुंजवडी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सचिन वाघमोडे, मुंजवडीचे माजी सरपंच हरिभाऊ कदम, शालेय स्कूल कमिटीचे अध्यक्ष रामचंद्र शिंदे, श्रीराम खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले इत्यादी मान्यंवर याप्रसंगी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक कृष्णाथ चोरमले यांनी केले ध्वजारोहण कार्यक्रमानंतर 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडा सादर करून मुलींचे आकर्षक व सुंदर लेझीम नृत्य सादर करण्यात आले.
कार्यक्रमास विद्यालयातील उपशिक्षक प्रवीण निंबाळकर ढवळे मॅडम येळे सर बापूराव जाधव नाळे सर आवटे मामा इत्यादीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.