ताज्या घडामोडी

फलटण येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती निमित्त गजी नृत्य ओवी स्पर्धाचे आयोजन

प्रथम विजेत्या प्रथम ३ संघाला सन्मानपत्र सन्मानचिन्ह व आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत

फलटण प्रतिनिधी- फलटण येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने भव्यगजी नृत्य व ओवी स्पर्धांचे आयोजन गुरुवार दिनांक २० जून २०२४ रोजी करण्यात आले असल्याची माहिती राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव गुरुवार दिनांक २० जून २०२४ रोजी आयोजित करण्यात आला असून सकाळी ठीक ९ वाजता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात येणार येणार आहे.

तसेच याच ठिकाणी दिवसभर महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून त्याच ठिकाणी दिवसभर सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भव्य गजीनृत्य स्पर्धा व ओवी स्पर्धां आयोजित करण्यात आल्या आहेत. प्रथम तीन क्रमांकासाठी प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व आकर्षक रोख बक्षिसे देण्यात येणार असून सहभागी सर्व संघाना ५ हजार रुपये प्रवास खर्च मानधन स्वरूपात देण्यात येणार असल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकाची आकर्षक सजावट करण्यात येणार असून सन २०२२-२४ या वर्षांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व समाजातील अधिकाऱ्यांच्या सत्काराचे आयोजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.


तरी इच्छुक गजी व ओवी संघांनी आपली नाव नोंदणी खालील मो.फोन वर करावी असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रा.भिमदेव बुरुंगले – ८२७५४५६४८८

माणिकराव सोनवलकर- ९८८१६४८४५६

दादासाहेब चोरमले – ९९२२३९२९४६

शंकरराव माडकर –९४२११८३२१

ॲड.ऋषिकेश काशीद९१३०७४५९४१

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.