(फलटण/ प्रतिनिधी)- फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यास 423/ 2020 भादवी कलम 326 323 504 506 34 प्रमाणे गुन्हा दाखल होता या गुन्ह्यामध्ये बारामती तालुक्यातील अक्षय उर्फ आकाश उर्फ भोऱ्या बापूराव जाधव राहणार मळद हा गेले चार वर्षापासून फरारी होता. सदरचा आरोपी हा बारामती शहर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्याच्यावर झोपडपट्टी दादा कायद्यान्वये (mpda)सुद्धा कारवाई झालेली आहे.
सदर आरोपीच्या पाठीमागे फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हे लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून होते तो काल त्याच्या घरी म्हणून आला त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक माननीय आंचल दलाल उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडिक सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर पोलीस हवालदार नितीन चतुरे अमोल जगदाळे तात्या कदम नवनाथ दडस यांनी केलेली आहे.
Back to top button
कॉपी करू नका.