फलटण प्रतिनिधी- साखरवाडी ता फलटण गावाच्या हद्दीत दि. १४ एप्रिल रोजी सकाळी ६.२० वाजता स्वतःचा जीव धोक्यात घालून फलटण ग्रामीण पोलिसांनी गांजा वाहतुक करणारी एक ४ चाकी एम. एच.- ११ बी एच ०४०४ गाडी पकडून १०.३० किलो गांजा व चार चाकी असा ५ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी ही माहिती दिली आहे.
अधिक माहिती अशी, डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यांना माहिती मिळाली की, एक स्विफ्ट कार सुरवडी गावाकडून साखरवाडी कडे जात आहे असून त्यामध्ये गांजा आहे त्यांनी तत्काळ तिथे उपस्थीत डीबी पथक व आरसीपी दोन कर्मचारी यांच्या मदतीने ती गाडी अडविण्याचा प्रयत्न केला सदर गाडीत दोन व्यक्ती होते. एक चालक व एक त्याचे बाजूला बसला होता गाडी थांबली त्यावेळी ड्राइवर बाजूने पीएसआय बदने चालकाशी चौकशी करत असताना चालकाने अचानक दरवाजा ओढून घेतला व गाडी सुरू केली पीएसआय बदने यांचा उजवा हात दरवाजा मधे अडकला व गाडी चालकाने त्याना फरफटत नेले त्यांचे पायाचे संपूर्ण कातडी जमिनीला घासलेमुळे निघाली त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. पुढे तशीच गाडी सुरू असताना ७ सर्कल रोड येथे राम भोसले यांच्या शेतात गाडी धडकून थांबली त्यावेळी सदर गाडीचा चालक पळून गेला शेजारी बसलेले व्यक्ती स्थूल असलेमुळे पळाला नाही नंतर डीबी स्टाफ तिथे पोहचला त्यावेळी स्विफ्ट डिजायर गाडीत पांढऱ्या गोणीत १०.३० किलो गांजा मिळून आला बाजूस बसलेले इसमाने स्वतःचे नाव सांगणेस सुरवातीला नकार दिला व नंतर खोटे नाव सांगितले नंतर त्याने त्याचे नाव लक्ष्मण रामू जाधव वय अंदाजे ६० वर्ष राहणार पिलीव ता माळशिरश जिल्हा सोलापूर सांगितले पळून गेलेल्याचे नाव रणजीत लक्ष्मण जाधव आहे सदर इसमावर पूर्वी म्हसवड, लोणंद, माळशिरस या ठिकाणी ४ गांजा वाहतूक गुन्हे आहेत सदर गाडी शेतात गेल्याने त्यालाही मुका मार लागला आहे व तो वेदना होत असलेचे सांगत होता डीबी पथकाने पीएसआय बदने व संशयित लक्ष्मण रामू जाधव याला फलटण येथील खाजगी रुग्णालयात व तिथून पुढे सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
गोपाल बदने यांनी जीवावर उदार होऊन गाडी अडविण्याचा प्रयत्न केला त्यात त्याचे पाय सोलून निघाले आहेत त्यांच्या या धाडसी कारवाईमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलिस अधिकाशक डॉ. वैशाली कडूकर,उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील महाडीक, पोलीक हवालदार नितीन चतुरे, तात्या कदम, अमोल जगदाळे, हनुमंत दडस, वैभव सूर्यवंशी, अमोल देशमुख,पोलिस उपनिरीक्षक दिपक पवार पो ना अमोल पवार अमोल देशमुख यांनी केली
Back to top button
कॉपी करू नका.