ताज्या घडामोडी
फलटण तालुका सर्व शासकीय, निमशासकीय विभाग व विविध सामाजिक संघटना यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर व महामॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू देणार तसेच वृक्षारोपणाचा कार्यक्रम देखील होणार

फलटण प्रतिनिधी- १५ ऑगस्ट २०२४ भारतीय स्वातंत्र्याचा ७७ वा वर्धापन दिन या दिनाचे औचित्य साधून गुरुवार दि.१५ ऑगस्ट व शुक्रवार दि.१६ ऑगस्ट रोजी फलटण तालुक्यातील उपविभागीय कार्यालय महसूल उपविभागीय कार्यालय पोलीस प्रशासन फलटण नगरपरिषद फलटण व फलटण तालुका पंचायत समिती तसेच शासकीय, निमशासकीय तसेच विविध सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने “महारक्तदान शिबिर” व दिनांक १६ ऑगस्ट रोजी भव्य “महा मॅरेथॉन स्पर्धा व वृक्षारोपण” या कार्यक्रमाचे आयोजन फलटण तहसील कार्यालयाच्या आवारात करण्यात आले असल्याची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.




