फलटण प्रतिनिधी- ४ फेब्रुवारी २०२४ रोजी मंथन वेल्फेअर फाउंडेशन यांच्या वतीने झालेल्या मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेत कुमारी वैभवी विपुल दोशी ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला या परीक्षेमध्ये कु. वैभवी विपुल दोशी हिने उल्लेखनीय यश संपादन करून संपूर्ण राज्यात ती अकराव्या क्रमांकाने व केंद्रात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली असून तिला ३०० पैकी २७६ इतके गुण प्राप्त झाले असून टक्केवारी ९२% एवढी आहे.
तिच्या या यशाबद्दल काल तिला फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहर यांच्या शुभहस्ते सन्मानपत्र प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले तिच्या यशाबद्दल सर्व स्तरातून वैभवी हिचे अभिनंदन होत आहे.
Back to top button
कॉपी करू नका.