ताज्या घडामोडी

फलटणचे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रसाद जोशी “एपीजे अब्दुल कलाम गोल्ड मेडल” पुरस्काराने सन्मानित

फलटण प्रतिनिधी- ग्लोबल इकॉनॉमिक प्रोग्रेस अँड रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मार्फत दिला जाणारा भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम गोल्ड मेडल अवॉर्ड सन -२४ या पुरस्काराने फलटणचे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर प्रसाद जोशी यांना सन्मानित करण्यात आले आहे.

नुकताच बेंगलोर येथे २७ ऑक्टोबर २०२४ रोजी सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश पद्मनाभन आणि बेंगलोर युनिव्हर्सिटीचे माजी व्हाईस चान्स्लर डॉ. एच शिवांन्ना यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार डॉ. जोशी यांना प्रदान करण्यात आला आहे.
ग्रामीण भारतात सर्वोत्कृष्ट ऑर्थोपेडिक सेवा करणाऱ्या डॉक्टरांना हा पुरस्कार दिला जातो.

या पुरस्काराबद्दल डॉ. प्रसाद जोशी यांच्याशी आमच्या प्रतिनिधी संवाद साधला असता ते म्हणाले की मानवतेसाठी समर्पित व उत्कृष्ट आणि प्रामाणिक सेवेची ही खरी ओळख आहे. तसेच गेल्या ७ वर्षातील हा ५ वा राष्ट्रीय पुरस्कार मला मिळाला आहे याचा मनस्वी आनंद असून या वैद्यकीय प्रवासात त्यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांनी त्यांची आई व पत्नी डॉ.प्राची आणि भाऊ प्रसन्न या सर्वांचा महत्त्वाचा सहभाग राहिला आहे तसेच जोशी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडच्या सर्व कर्मचारी यांचीही मला साथ लाभली आहे असे सांगताना ते शेवटी म्हणतात की, माझ्यावर पूर्ण विश्वास असलेल्या सर्व रुग्णांना त्याचबरोबर शेवटी मला हे घडवून आणण्यासाठी एक माध्यम बनविल्याबद्दल सर्व शक्तीमान परमेश्वरी शक्तीला माझा नेहमीच साष्टांग नमस्कार राहील असेही सांगावयास ते विसरले नाहीत.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.