फलटण प्रतिनिधी – फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी महाविद्यालय फलटण येथे श्रीमंत अनंतमाला देवी नाईक निंबाळकर बाईसाहेब यांची जयंती साजरी झाली. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रोफेसर डॉ. प्रभाकर पवार म्हणाले श्रीमंत अनंतमाला देवी नाईक निंबाळकर बाईसाहेब हे अत्यंत मानवतावादी व्यक्तिमत्व होते. त्यांनी नाईक निंबाळकर राजघराण्यावर मायेची पाखर धरून सर्व कुटुंबाला प्रेमाची व मायेची सावली दिली.
सर्व आबालवृद्ध यांना त्यांच्याबद्दल आदर व सन्मान होता.
राजघराण्यात वावरत असताना त्यांचा कमालीचा साधेपणा सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारा होता. त्यांनी आयुष्यभर आपले पती श्रीमंत विजयसिंह नाईक निंबाळकर उर्फ शिवाजी राजे यांना मोलाची साथ दिली मुला बाळांना उच्च शिक्षण देऊन मानसन्मान दिला श्रीमंत संजीवराजे हे त्यांच्या संस्कारात राहून सातारा जिल्हा व फलटण तालुक्याचे युवा नेते ते लोकनेते झाले.आज ते महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.
कार्यक्रमास त्यांच्या प्रतिमेला मा.प्राचार्य प्रोफेसर डॉ.पी.एच कदम व कनिष्ठ विभाग पर्यवेक्षक प्रा.देशमुख सर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमास वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक,प्राध्यापिका,शिक्षकेतर कर्मचारी वृंद,विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन विशेष दिन समितीचे चेअरमन डॉ. संतोष कदम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सौ. योगिता मठपती यांनी करून,आभार मानून कार्यक्रमाचा समारोप झाला.
Back to top button
कॉपी करू नका.