ताज्या घडामोडी

गजानन चौक येथे कमी उंचीची एल.टी.लाईन काढून ए.बी.केबल लाईन टाकली – शाखा अभियंता प्रदीप न

एम एस ई बी ची कामगिरी कौतुकास्पद: आता गणेश विसर्जन मिरवणुकीत लाईट जाणार नाही

फलटण प्रतिनिधी- श्री.गणेश मिरवणुकीमध्ये गजानन चौक येथील सप्लाय दरवर्षी बंद ठेवावा लागत होता या गोष्टीची दखल घेऊन फलटण येथील गजानन नवीन पाच खांब व एबी केवळ टाकले हे अवघड काम एमएसईबी च्या अथक प्रयत्नामुळे आज पूर्ण झाले असल्याची माहिती शाखा अभियंता रवींद्र ननवरे यांनी दिली आहे.

या कामा संदर्भात अधिक माहिती देताना रवींद्र ननवरे म्हणाले की, हे अशक्य असणारे काम करीत असताना फलटणचे कार्यकारी अभियंता श्री. प्रदीप ग्रामोपाध्याय त्याचबरोबर अतिरिक्त कार्यकारी अभियंता फलटण शहर उपविभाग माननीय श्री. लोंढे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व फलटण शहरांमध्ये लाईन स्टाफ एम. एस. आर. एम. सी. कंत्राटदार यांच्या सहकार्यामुळे ४ दिवसात हे काम पूर्ण केले आहे.


सदर कामांमध्ये सर्व कंत्राटदार, कामगार, व एल.एम. व ए.एल.एम. बाह्यस्त्रोताद्वारे व फलटण शाखा एक मधील स्टाफ या सर्वांनीच अविरतपणे कष्ट केले त्यामुळेच हे काम चार दिवसात पूर्णत्वाला गेले.

यामुळे आता श्री. गणेशाच्या मिरवणुकीमध्ये गजानन चौक येथील लाईट जाणार नाही याचा मनोमन आनंद असल्याचेही शेवटी शाखा अभियंता रविंद ननवरे यांनी सांगितले आहे.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.