फलटण प्रतिनिधी- जाधववाडी ता. फलटण येथील श्री. बिरदेव देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महात्मा शिक्षण संस्था संचलित मूकबधिर विद्यालयातील मुलांना खाऊ व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
श्री.बिरदेव देवस्थान ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा.दत्ता चोरमले, सचिव सुरेश पोपटराव चोरमले, तसेच श्री.बिरदेव देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त अविनाश चोरमले, नेताजी चोरमले, सुनील चोरमले, राजेंद्र चोरमले, सुरेश चोरमले व बंडोपंत चोरमले इत्यादी मान्यवरांच्या शुभहस्ते मूकबधिर विद्यालयातील दिव्यांग मुलांना खाऊ व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी जेष्ठ कवयित्रीच्या भरला महात्मा शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष कृष्णात उर्फ दादासाहेब चोरमले सचिव सो वैशाली चोरमले मूकबधी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली शिंदे इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्राध्यापक दत्ता चोरमले म्हणाले की, श्री.बिरदेव देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून अनेक समाजातील गरीब, उपेक्षित, गरजू व वंचित घटकांना नेहमीच मदतीचा हात पुढे केला जातो.
याचाच एक भाग म्हणून आज आम्ही महात्मा शिक्षण संस्था संचलित मूकबधिर विद्यालयातील मुलांना खाऊ व शालेय साहित्याचे वाटप केले आहे या ठिकाणी आल्यानंतर शाळेचा परिसर पाहून खूप मनाला समाधान वाटले.
विशेष करून ही शाळा उभी करण्यासाठी महात्मा शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष कृष्णात उर्फ दादासाहेब चोरमले यांनी खूप खूप मेहनत घेतली असल्याचे पहावयास मिळाले गेल्या २० वर्षापूर्वी या ठिकाणी १७ गुंठे जागा स्व-कमाईतून घेऊन ती संस्थेच्या नावावर केली.
खंरतर अशा सेवाभावी व्यक्ती समाजामध्ये कमी प्रमाणात पहावयास मिळतात तेवढ्यावरच ते थांबले नाहीत त्यांनी समाजातील आपल्या मित्र मंडळींच्या सहाय्याने १५ वर्षाच्या कालावधीमध्ये दुमजली इमारत उभा केली.
तसेच मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड हा परिसर निसर्गरम्य केल्याचे पहावयास मिळते ही कामगिरी दादासाहेब चोरमले यांची कौतुकास्पद असल्याचेही शेवटी बिरदेव देवस्थान ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. दत्ता चोरमले यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष दादासाहेब चोरमले यांनी शाल श्रीफळ व मूकबधिर मुलांनी केलेला बुके देऊन केले. तर आभार प्रदर्शन सौ.वैशाली चोरमले यांनी मानले.