ताज्या घडामोडी
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना अंनिसच्या वतीने सन्मानित
ॲड.कांचन खरात यांना अंनिसच्या वतीने महिला दिनानिमित्त सन्मानित करण्यात आले

फलटण प्रतिनिधी – जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित समता घरेलू महिला कामगार संघटनेच्या कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी असणाऱ्या व सतत महिलांच्या उन्नतीसाठी कार्यरत असणाऱ्या महिलांना अंनिस फलटण शाखे तर्फे अंनिस समाज प्रबोधिनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने सतत गोरगरीब वंचित समाजासाठी व महिलांसाठी सातत्याने कार्यरत असणाऱ्या फलटण येथील ज्येष्ठ कार्यकर्त्या ॲड. कांचनकन्होजाताई धोंडीराम खरात, महिला घरेलू कामगार संघटनेच्या माध्यमातून महिलांच्या उन्नतीसाठी कार्य करीत असलेल्या कल्पनाताई मोहिते, नकुसा फरतडे,साजिया यांना वरील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी सातारा जिल्हा ॲम्युचर
खो – खो असोसिएशनचे उपाध्यक्ष दादासाहेब चोरमले, आनंद देशमुख सर, अंनिस फलटण शाखेचे कार्यकर्ते वसिम शेख सर, अयाज आतार सर,आरती काकडे आणि मोहिनी भोंगळे सुपर्णाताई अहिवळे तसेच मंदाकिनी गायकवाड इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.