खंडाळा प्रतिनिधी उत्तम चोरमले- बाळू पाटलाची वाडी तालुका खंडाळा येथील जिल्हा परिषद शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम नुकताच उत्साहात संपन्न करण्यात आला.
याप्रसंगी बाळू पाटलाची वाडी ग्रामपंचायतचे सरपंच सौ. शोभा धायगुडे, तसेच गावचे नेते श्री किसन तात्या धायगुडे व उद्योगपती श्री. प्रताप धायगुडे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. तात्याबा धायगुडे शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, पोलीस पाटील पाणीपुरवठा सोसायटीचे चेअरमन इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
याप्रसंगी शाळेतील सर्व मुलांनी आपले कलागुण सादर केले विविध थीम घेऊन तयार केलेल्या कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला उपस्थित मान्यवरांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केले.
प्रारंभी जिल्हा परिषद शाळा बाळू पाटलाची वाडी शाळेचे मुख्याध्यापक जागीरदार सर व उत्तम चोरमले सर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या मान्यवरांची शाळा व्य.वस्थापन समिती अध्यक्ष श्री तात्यासाहेब धायगुडे यांनी मानले.