ताज्या घडामोडी

सातारा जिल्हा समता परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ.बी.के. यादव यांची निवड

फलटण – आस्था टाईम्स वृत्तसेवा: नुकतीच सासवड समता परिषदेचे कार्याध्यक्ष माजी खा.समीर भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली सासवड येथे समता परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सातारा जिल्हा समता परिषदेच्या अध्यक्षपदी फलटण येथील प्रसिद्ध डॉ. बी.के. यादव यांची निवड करण्यात आली.

याप्रसंगी समता परिषदेचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब भुजबळ, सातारा जिल्हा समता परिषदेचे अध्यक्ष दशरथ फुले, अखिल भारतीय माळी महासंघाचे अध्यक्ष अरविंद राऊत, युवा अध्यक्ष अमोल रासकर, ओबीसी आरक्षण समितीचे गिरीश बनकर, शंकरराव अडसूळ इत्यादी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
ओबीसी चे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र राज्याचे अन्नपुरवठा व नागरी सेवा मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून समता परिषद महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये ओबीसी च्या प्रश्नावर कार्यरत आहे. समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी समाजाचे प्रश्न सोडविण्याचे काम केले जाते.
डॉ. बी के यादव यांनी यापूर्वी ओबीसी संघर्ष समिती सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले असून ओबीसी आरक्षणासाठी ज्या ज्या चळवळी उभा राहिल्या त्या मध्ये सक्रिय होऊन यादव काम करीत राहिलेले आहेत.
माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी मंत्री सुधाकर गणगणे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे त्याचप्रमाणे राष्ट्रीय समाज पक्षाची राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांच्याबरोबर त्यांनी सक्रिय होऊन राजकारण व राजकारणात काम केले आहे त्यांना समाजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असून निश्चितच ओबीसी समाजाला ते भविष्यातही समता परिषदेच्या माध्यमातून न्याय देतील अशी अपेक्षा यावेळी समीर भुजबळ यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना डॉ. बी. के. यादव म्हणाले की, भविष्यात मी समता परिषदेच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित घटकासाठी काम करणार असून सध्या ओ.बी.सी.च्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे ओ.बी.सी., बी.सी., विमुक्त जाती व भटक्या जमाती या वर्गासाठी भविष्यात अधिक ताकतीने काम करण्याचे ठरवले असल्याचे सांगून यादव पुढे म्हणतात मा. ना. छगनरावजी भुजबळ हे एकमेव ओ.बी.सी. आणि दुर्बल घटकासाठी संघर्ष करीत असून त्यांच्या पाठीशी सर्व समाज बांधवांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे आणि तेच काम नेमके आम्ही भविष्यात करणार असल्याचेही शेवटी बी.के. यादव यांनी सांगितले.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.