ताज्या घडामोडी

फलटण शहर पोलीस स्टेशन यांच्या माध्यमातून नशा मुक्त भारत अभियानाचे आयोजन – पो. नि. हेमंतकुमार शहा

फलटण : आस्था टाईम्स वृत्तसेवा – फलटण शहर पोलीस ठाण्याच्या वतीने दि.१३/०८/२०२५ ते दि. १७/०८/२०२५ या कालावधीत सातारा जिल्ह्यात ‘नशामुक्त भारत’ अभियान राबविण्यात बाबतच्या सूचना मा. पोलीस अधीक्षक, सातारा यांनी दिल्या होत्या.

याच अनुषंगाने आज दि.१७/०८/२०२५ रोजी स. ०७.०० वाजता ते ०८.०० वाजण्याचे दरम्यान फलटण शहर पोलीस ठाणे आणि सायकल ग्रुप तर्फे फलटण शहर पोलीस ठाण्या ठाण्याच्या वतीने फलटण शहर पोलीस ठाणे – पाचबत्ती चौक – नाना पाटील चौक – ते फलटण शहर पोलीस ठाणे या मार्गाने जनजागृती करण्यासाठी सायकल रॅली काढण्यात आली होती अशी माहिती फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी दिली आहे.


या रॅलीमध्ये नशेमुळे होणाऱ्या दुष्परिणामाबाबत जागृती करणारे फलक प्रदर्शित करण्यात आले होते.
या रॅली मध्ये सायकलस्वार श्री. तुकाराम नामदेव कोकाटे, डॉ. राजगोपाल खंडेलवाल, श्री. राम काका मुळीक, मेजर अर्जुन नाळे, गणपतराव बनसोडे, रवी शिंदे आणि इतर ४० ते ४५ सायकलस्वार यांचेसह पोलीस उपनिरीक्षक अंकुश इवरे, सहाय्यक पोलीस फौजदार संतोष कदम, पोलीस हवालदार राजेंद्र घाडगे, अमोल रनवरे, पोलीस अंमलदार सिताराम बगले, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री बहिरट, वाहतूक पोलीस अंमलदार सुरज परिहार, पांडुरंग धायगुडे यांनी सहभाग घेतला होता.

पोलीस अंमलदार स्वप्नील खराडे यांनी याबाबत विशेष सहभाग घेऊन नियोजन केले आणि सहभाग घेतला.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.