(जावली/अजिंक्य आढाव) – खरीप हंगाम सुरू असुन या हंगामात बाजरी पिक प्रमुख मानले जाते. फलटण तालुक्यात जावली गावातील शेतकऱ्यांसाठी एडवांटा इंटरप्राईजेस लिमीटेड (पीएसी ९३८) कंपनीच्या वतीने बाजरी पिक उत्पादन बाबत कार्यक्रम दि.१२ रोजी आयोजित करण्यात आला होता.
एडवांटा पीएसी 938 (Advanta PAC 938) हे एडवांटा कंपनीचे एक हायब्रीड बाजरीचे बीज आहे, जे विशेषतः उच्च उत्पादन देणारे असून पशुधनासाठी पौष्टिक चाऱ्याच्या उत्पादनासाठी वापरले जाते. हे पीक शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळवून देण्यास मदत करते, आणि या बियाण्याला ‘बाजरे का बादशाह’ असेही म्हटले जाते.
कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून वेदांत पाटील उपस्थित होते
सध्याच्या मे महिन्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडल्यामुळे बाजरी पिक फलटण तालुक्यात मोठ्या संख्येने पेरणी केली आहे.यातच भरघोस उत्पादन घेणारे पिक म्हणून शेतकऱ्यांकडून एडवांटा कंपनीला प्राधान्य दिले गेले.
या कार्यक्रमासाठी श्रीकृष्ण एजन्सी सचिन पडर यांनी सहकार्य केले.उपस्थित शेतकऱ्यांना जेवण देण्यात आले.जावली गावातील नामदेव भिकू गावडे यांच्या शेतात कार्यक्रम संपन्न झाला.