ताज्या घडामोडी

वीर धरणातून नदीपात्रात ६७३७ क्युसेस पाणी सोडण्यात आले.

फलटण आस्था टाईम्स वृत्तसेवा – वीर धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार आज दिनांक २२/६/२५  दुपारी १२ वाजता वीर धरणाच्या विदुयतगृहाद्वारे  २१००cusecs व सांडव्याद्वारे  ४६३७ cusecs असा एकूण ६७३७ cusecs विसर्ग  नदीपात्रात सुरू करण्यात येत आहे.
पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये आवश्यक तो बदल करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता निरा उजवा कालवा यांनी कळविले आहे.

तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात पंप अथवा तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत.
कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, काही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदारी संबंधितांची राहील.

शेअर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका.