सातारा दि.18- सातारा जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या मुला-मुलींच्या शासकीय विश्रामगृहामध्ये या शैक्षणिक वर्षाकरीता शालेय विद्यार्थी तसेच इयत्ता 11 व 12 वी व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर झाले आहे. यासाठी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज https://hmas.mahait.org या पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत. विभागीय शाळा आणि महाविद्यालयांच्या प्रवेश वेळापत्रकानुसार काही प्रमाणात बदल करण्याची मुभा संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. वसतिगृह प्रवेशाकरीता अर्जाची अंतिम तारीख, प्रवेश यादी जाहीर होण्याची तारीख शालेय विद्यार्थी १७ जुलै २०२५, २१ जुलै २०२५ रोजी व इयत्ता ११ वी व १२ वी २३ जुले २०२५ रोजी. २५ जुलै २०२५ रोजी बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.
तसेच, वसतिगृहांमध्ये प्रवेशासाठी गुणवत्ता व आरक्षणाचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांनी तांत्रिक कारणामुळे फॉर्म भरू शकला नसेल, तर आठवड्याच्या आत फॉर्म भरून घ्यावा. वसतिगृहांमध्ये शिल्लक जागा राहिल्यास, मुदत संपल्यानंतरही अर्ज स्वीकारून प्रत्येक आठवड्यात नवीन यादी जाहीर केली जाईल. प्रवेश प्रक्रियेची पारदर्शकता राखण्याचे व ती योग्य प्रकारे पार पाडण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचे श्री सुनिल जाधव, सहायक आयुक्त, समाज कल्याण सातारा यांनी कळविले आहे.
Back to top button
कॉपी करू नका.