ताज्या घडामोडी
श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपारिक क्रीडा महाकुंभ ; विटी दांडूत अंधेरी इंग्रजी माध्यमिक शाळेला विजेतेपद दोरी उडीला जोरदार प्रतिसाद

(मुंबई /प्रतिनिधी) – मुंबई शहर व मुंबई उपनगरात श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचा थरार वेगवेगळ्या २२ ठिकाणी सुरु असून मुंबईतील क्रीडा क्षेत्रात आज विटी दांडू व दोरी उड्या खेळ जोरदार रंगले. या स्पर्धा महाराष्ट्र राज्य शासन, मुंबई महापालिका आणि क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने व मुंबई पोलीस, मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ व मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील संबधित क्रीडा संघटना यांच्या सहकार्याने मा. ना. मंगल प्रभात लोढा, मंत्री तथा पालक मंत्री मुंबई उपनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहेत.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील अंधेरी विभागात झालेल्या विटी दांडू खेळात १७ वर्षाखालील मुलांच्या अंतिम सामन्यात अंधेरी इंग्रजी माध्यमिक शाळेने अंधेरी मराठी मनापा शाळेचा १५-१५ अशा बरोबरी नंतर नाणेफेकीवर बाजी मारली. अतिशय चुरशीच्या सामन्यात दोन्ही शाळेच्या मुलांनी कडवी झुंज देत बरोबरी साधली. शेवटी पंचांनी नाणेफेक करून अंतिम विजेता घोषित केला. या सामन्यात अंधेरी इंग्रजी शाळेच्या कार्तिक नलगे, विशाल राठोड यांनी जोरदार खेळ केला. तर त्यांना टक्कर देत अंधेरी मराठी मनापा शाळेच्या तरुण यादवने धडाकेबाज खेळ केला मात्र त्याला नाणेफेकीवर मिळालेल्या विजयात काहीही करता आले नाही.
तृतीय क्रमांकाच्या सामन्यात न्यू. वर्सोवा हिंदी शाळेने अंधेरी मनापा माध्यमिक (टाटा कम्पाउंड) शाळेचा १०-१५ असा ५ गुणांनी धुव्वा उडवला. तर मुलींच्या गटात एच. एस. बी. टी. हिंदी शाळेचा संघ अंतिम विजेता ठरला.
दोरी उड्या